धान्य निवडण्यात सुद्धा काय अनामिक मजाय...!!! मला आठवतं, शाळेत असताना सुट्टीत आजीकडे गावी गेलं कि हा कार्यक्रम ठरलेला असायचा.मग एक दिवस सकाळी ऊन्हं वर आली कि घराच्या गच्चीवर आज्जीची जुनी साडी अंथरायची. चार टोकाला चार दगड ठेवायचे. तसले मोठाले दगड शोधण्यासाठी मग निम्मा परीसर पालथा घालायचा. आणि नाहीच सापडले तर मध्यम आकाराचे तिन-चार दगड प्रत्येक कोप-यात ठेवायचे. एकजुटीनं काम करणं म्हणजे काय हे आज्जीला त्या दगडांनी शिकवलं असावं! दोन मावश्या आणि मी अशी आमची टिम. आज्जी टिम लिडर. मग जे काही धान्य असेल त्याची भरलेली पोती गच्चीवर न्यायची अन् अंथरलेल्या साडीवर बिन्धास ओतुन द्यायची. मग हाताने सावरत एक एक दाणा वेगळा करायचा अन् त्या साडीवर प्रत्येकाला स्वतंत्र जागा द्यायची. नो ओव्हरलॅपींग!!
क्वचितच कधी धान्य खायला माकडं यायची. नाहीतर कबुतर, चिमण्या, साळुंकी असे रोजचे पक्षी आहेतच. इतरवेळी राखण करायला मला फार भारी वाटायचं. माकडं आली कि मात्र धांदल उडायची.
दुपारची जेवण आटपली झोप झाली कि सगळं धान्य खाली आणायचं. मग मी दोन मावश्या आणि आज्जी मोठी ताटं घेऊन धान्य निवडायला बसायचो. धान्यातली घाण, किडे वेचुन वेचुन पाण्यात टाकायच्या. खिडकीतुन येणारं हलकं ऊन आणि जोरात वाहणारा वारा यांचं कोंबीनेशन म्हणजे काहीतरीच भन्नाट असायचं. या निवडा-निवडीत कित्येक गप्पा व्हायच्या, गाणी व्हायची, जोक्स व्हायचे. मधेच आजोबा फक्कड चहा बनवायचे मग त्याच्या जोडीला काहितरी तळण करुन कामाचा कंटाळा घालवायचा. चहा प्यावत नसेल तर कधीतरी आईसक्रिम पार्टी व्हायची.... तेव्हा कंटाळवाणं, नको वाटणारं ते काम आज रात्री एकच्या ठोक्याला माझ्या मनात इतक्या आठवणी क्रियेट करेल अस कधीच वाटलं नव्हतं!
मग आज्जी सगळं धान्य परत परत पाखडायची अन् मग पुन्हा सारं धान्य कोठीत भरुन ठेवायचं आणि अंधार पडायच्या आत घर झाडुन घ्यायचं. झालेल्या अंधाराला आणि रात्रीला आम्ही काम केल्याचा कोणताच पुरावा आज्जी मागे ठेवायची नाही. बसुन बसुन दुखणारी पाठ हाच काय तो हिडन एव्हिडन्स.... ©Renuka

No comments:
Post a Comment